लोकप्रतिनिधींनी महापौरांसमोर वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:55 AM2018-10-13T00:55:36+5:302018-10-13T00:57:18+5:30
महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी रंजना भानसी यांच्यासमोर प्रभाग क्र मांक २६ मधील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी सात दिवसांत सर्व सोडवून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सातपूर: महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी रंजना भानसी यांच्यासमोर प्रभाग क्र मांक २६ मधील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी सात दिवसांत सर्व सोडवून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत शुक्र वारी (दि. १२) प्रभाग क्र मांक २६ मधील समस्यांची पाहणी केली. प्रभागातील शिवशक्ती चौक, खुटवडनगर, चुंचाळे, अष्टविनायकनगर, सीटू भवन परिसर, अष्टविनायकनगर, अंबडलिंक रोड, पाटील पार्क, विराट संकुल, शिवाजी चौक आदी भागात जाऊन पाहणी केली. यात डासांचा प्रादुर्भाव, रस्त्यावर पडलेला कचरा, नाल्यांची सफाई, धूर फवारणी, मातीचे ढिगारे, पाण्याची गळती, वाढलेले अतिक्रमण, पथदीप, रस्ते आदी समस्या प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कथन केल्या़ या दौºयाची पाहणी केल्यानंतर महापौरांनी मूलभूत सुविधांबरोबर इतर भेडसावणाºया समस्या तातडीने सोडवाव्यात असे आदेश दिले.
यावेळी सभागृहनेते दिनकर पाटील, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, प्रभाग सभापती योगेश शेवरे, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे, अलका आहिरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.