सीए परीक्षेत नाशिकचा टक्का वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:06 AM2019-01-24T01:06:36+5:302019-01-24T01:07:05+5:30
दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंट आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या मुख्य तसेच फाउंडेशन परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. नव्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेनंतर सीए परीक्षेच्या निकालाचा देशभर टक्का वाढला असून, नाशिकचीदेखील टक्केवारी वाढली आहे.
नाशिक : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंट आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या मुख्य तसेच फाउंडेशन परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. नव्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेनंतर सीए परीक्षेच्या निकालाचा देशभर टक्का वाढला असून, नाशिकचीदेखील टक्केवारी वाढली आहे.
फाउंडेशनमध्ये नाशिकची मिताली बोथरा ही भारतात २४व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर जिंकल सुरेशभाई मवानी हीने सर्व विषयात एक्झमशन मिळविले आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या द चार्टर्ड अकाउंट (सीए) अंतिम परीक्षा आणि सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. सीए अंतिम परीक्षा (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) तसेच सीपीटी फाउंडेशनसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
नाशिकमधून सीए ओमप्रकाश जाजू यांचा मुलगा सत्यम जाजू, सीए विवेक राठी यांची कन्या मानसी राठी, सीए संजीव मुथा यांची कन्या सलोनी मुथा तसेच विशाखा संकलेचा, शुभम चोरडिया, चंदना कांकरिया, प्रतीक राठी, ऋतुजा अमृतकर यांनी सीए परीक्षा उतीर्ण केली आहे. तसेच प्रदिप जोशी, जयेश मालपुरे, शुभम चोरडीया , शुभम बच्छाव, यश शहा, अश्विनी ढवळे, सत्यम जाजू हे देखील उत्तीर्ण झाले आहे. नाशिक निकाल यंदा सकारत्मक असून मागील वर्षीच्या तुलणेत टक्केवारी वाढली असल्याचे कोचिंग क्लासेस असोसिएशनचे सेक्रेटरी सीए लोकेश पारख यांनी सांगितले. यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे ही दिसून आले. नाशिकसाठी यंदाचा निकाल प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया नाशिक सीए असोसीशनचे अध्यक्ष मिलन लुनावत यांनी व्यक्त केली.
लक्षवेधी वाढ
सीए फायनलच्या नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या उत्तीर्ण निकालात मे २०१८ च्या निकालाच्या तुलनेत लक्षवेधी वाढ झाली आहे. जुन्या अभ्यासक्र माच्या परीक्षेत ग्रुप १ मध्ये एकूण ३०.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते; यात यंदाच्या निकालात १४.३४ ने वाढ झाली आहे. ग्रुप २च्या निकालात मे मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत १३.५९ टक्के निकाल होता तर नोव्हेंबर २०१८ च्या परीक्षेचा निकाल ग्रुप २ साठी २३.४१ टक्के आहे. दोघाही ग्रुपची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल १५.०३ टक्के आहे. मे २०१८ मध्ये झालेल्या दोन्हीही ग्रुपच्या एकत्रित परीक्षेचा निकाल ९,०९ टक्के होता.
आदित्य गुजराथी देशात ४१वा
नाशिकरोड येथील आदित्य गुजराथी सीए अंतिम परीक्षेत देशात ४१वा आला आहे. कुटुंबात सीए कुणीही नसताना गुजराथी याने मोठ्या परिश्रमाने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सीएच्या जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन्ही गु्रप उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३८३ इतकी असून, निकालाची टक्केवारी १५.०३ टक्के इतकी आहे. फाउंडेशन परीक्षेसाठी २७,७२४ मुले प्रविष्ट झाले होते त्यापैकी ११९३५ मुले उतीर्ण झाले तर निकालाची टक्केवारी ४३.०३ इतकी आहे.
मुलींमध्ये २०,९६८ प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ९५५३ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेची टक्केवारी ४५.५६ इतकी आहे.