अर्ज दाखल करताना उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन
By admin | Published: June 20, 2015 01:43 AM2015-06-20T01:43:26+5:302015-06-20T01:44:01+5:30
अर्ज दाखल करताना उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल(दि.१९) बाजार समितीच्या आजी-माजी संचालकांसह दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये माजी अध्यक्ष व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासह आमदार अपूर्व हिरे, माजी संचालक तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, अनिल झंवर, विमल जुंद्रे, चंद्रकांत निकम, दिलीप थेटे यांच्यासह ताराबाई माळेकर, सुरेश निमसे, दौलत पाटील, काळू खोटरे, संजय तुंगार, प्रभाकर मुळाणे, जि.प. सदस्य भास्कर गावित, पंडित पाटील, विलास पगार, उत्तम बोराडे, नामदेव गायकर यांच्यासह ३६ उमेदवारांचा समावेश होता. काल दिवसभरात एकूण ५० अर्जांची विक्री करण्यात आली. त्यात सोसायटी गटासाठी २१, ग्रामपंचायत-१६,व्यापारी-१२ व हमाल व मापारी गटासाठी १ अशा एकूण ५० अर्जांची विक्री करण्यात आली. तसेच ३६ उमेदवारांनी एकूण ५१ अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई यांच्याकडे दाखल केले. काल ५१ अर्ज दाखल करण्यात आले. त्यात सोसायटी गटातून २२, ग्रामपंचायत गटातून ८, व्यापारी गटातून ५, तर हमाल व मापारी गटातून १ अशा एकूण ५१ अर्जांचा समावेश आहे. आ. अपूर्व हिरे तसेच माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. (प्रतिनिधी)