‘स्थायी’ बुचकळ्यात

By admin | Published: June 28, 2016 12:10 AM2016-06-28T00:10:53+5:302016-06-28T00:13:04+5:30

आयुक्तांनी टाकले कोड्यात

'Permanent' | ‘स्थायी’ बुचकळ्यात

‘स्थायी’ बुचकळ्यात

Next

नाशिक : महापालिकेच्या सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात ११९२ कोटी रुपये उत्पन्न निश्चित करण्यात आले. प्रत्यक्षात ८६२ कोटी रुपयेच प्राप्त झाले. त्यामुळे ३३० कोटी रुपयांची तूट कशी भरून काढायची, असा प्रश्न आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीला केला आणि चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातही अपेक्षित उत्पन्नाची वसुली कशी करायची, याचेसुद्धा मार्गदर्शन करा, असे कोडे घातले. आयुक्तांनी थेट मुद्द्यालाच हात घातल्याने स्थायी समितीही बुचकळ्यात पडली आणि सदर अंदाजपत्रक हे मागील समितीचे असल्याचे सांगत मंगळवारच्या महासभेतच काय चर्चा करायची ती करू, असा पवित्रा घेत सदस्यांनी सभा आटोपती घ्यायला लावली.
मनपाचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी (दि.२८) स्थायी समिती महासभेला सादर करणार आहे. तत्पूर्वी, मागील स्थायी समितीच्या अंदाजपत्रकीय सभेचे इतिवृत्तच मंजूर नसल्याचे निदर्शनास आल्याने स्थायीची तातडीने सभा बोलाविण्यात आली होती.

Web Title: 'Permanent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.