पाणीपुरवठा दरवाढीस स्थायीची मान्यता

By admin | Published: February 29, 2016 10:58 PM2016-02-29T22:58:18+5:302016-02-29T23:01:42+5:30

मालमत्ता करवाढ फेटाळली : उत्पन्नवाढीसाठी सूचनांचा वर्षाव

Permanent approval for water supply | पाणीपुरवठा दरवाढीस स्थायीची मान्यता

पाणीपुरवठा दरवाढीस स्थायीची मान्यता

Next

नाशिक : महापालिकेच्या सन २०१६ -१७च्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी मालमत्ता करात सुचविलेली १४ टक्के दरवाढ स्थायी समितीने फेटाळून लावली मात्र, पाणीपुरवठा दरात सरसकट एक रुपयाने वाढ करण्यास मान्यता दिली. याशिवाय, सदस्यांनी उत्पन्नावाढीसाठी अनेक स्त्रोत असल्याचे सांगत सूचनांचा वर्षाव केला. यावर्षी नगरसेवक निधी दिला नसल्याने नाराजी व्यक्त करतानाच प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.
आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी स्थायी समितीला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करतानाच घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

Web Title: Permanent approval for water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.