प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:26 AM2020-08-03T01:26:00+5:302020-08-03T01:26:29+5:30
कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात येणार असून कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटरची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. मुबलक आॅक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेशित करण्यात आले आहे.
नाशिक : कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात येणार असून कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटरची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. मुबलक आॅक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेशित करण्यात आले आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्याबरोबरच रूग्णांवरील प्रभावी उपचारासाठी शासनाकडून अनेक उपायोजना केल्या जात आहे. याबाबतची माहिती नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत.
सर्व तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून कोविडबाबत करायच्या उपाय योजनांबाबत माहिती देण्यात यावी. तसेच कोमॉर्बिड रु ग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करून लक्ष ठेवण्यात यावे असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड-१९चा आढावा व उपाययोजनांबाबत दिंडोरीमध्ये कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी या तालुक्यांची कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी दिंडोरीमध्ये तत्काळ सेंट्रल आॅक्सिजन सिस्टीम सुरू करण्यात यावी, तसेच अन्यत्रदेखील आॅक्सिजन सेंटरच्या त्वरित अंमलबजावणीसाठी उपाय योजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.
यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ.भारती पवार, आमदार नितीन पवार, श्रीराम शेटे, सुरगाणा पंचायत समिती सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
रुग्णांची माहिती प्रशासनास देण्याचे आवाहन
लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी उद्योग व कंपन्या सुरू ठेवाव्या लागणार आहेत. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी हळूहळू पावले टाकावे लागत आहेत. उद्योग क्षेत्रात होत असलेल्या कोरोनाच्या संसर्गास रोखण्याच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे दररोज स्क्रिनिंग करावे, कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून आढळलेल्या रु ग्णांची माहिती प्रशासनाला द्यावी; रु ग्णांची माहिती लपविण्यात येऊ नये, याबाबत कंपन्या व उद्योगांना सूचना देण्यात याव्यात, रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात असे स्पष्ट दिशानिर्देश भुजबळ यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला दिले आहेत.