कायमस्वरूपी उपाययोेजनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2015 10:29 PM2015-09-20T22:29:02+5:302015-09-20T22:29:30+5:30

वणी : पुराचे पाणी वसाहतीत शिरल्याने नुकसान

Permanent solution needed | कायमस्वरूपी उपाययोेजनेची गरज

कायमस्वरूपी उपाययोेजनेची गरज

Next

वणी : वणीच्या खंडेरावनगरमध्ये पुराचे पाणी शिरून या भागांतील राहिवाशांची झालेली आर्थिक हानी ही सन २००६ वर्षाप्रमाणे नदी पात्राच्या आकार मानात बदल, धोकेदायक ठिकाणी मानवनिर्मित अडथळे प्रशासकीय व्यवस्थेची गांधारीची भूमिका यामुळे खडेराव नगरातील राहिवासी ऐन पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.
गुरुवार १७ सप्टेंबर रोजी तब्बल वीस तास वणी व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली १५५ मिलीमीटर पाऊस पडल्याने जिकडे-तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली पावसामुळे अनेकांची मोठी आर्थिक हानी झाली. त्यात वणी-कळवण रस्त्यावरील खंडेरावनगर पावसाच्या तडाख्यात सापडले ७२ घरांमध्ये पाणी शिरून सुमारे पाच लाखांच्या संसार उपयोगी वस्तुंचे नुकसान झाल्याचा महसूल यंत्रणेचा अंदाज आहे. खंडेरावनगरात १२६ घरे आहेत. ५ जुलै २००६ रोजी वादळी पावसामुळे ६ जुलै 2००६ रोजी ही सर्व खंडेरावनगर पुराच्या पाण्यात बुडाले होते. त्यावेळी १२६ कुटुंबीयांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य पुराच्या तडाख्यात सापडले होते. दहा ते बारा लाख रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा तेव्हा करण्यात आला होता. प्रत्यक्षात नुकसानीची आकडेवारी जास्त असल्याची ओरड तेव्हा करण्यात आली होती.
दरम्यान, नैसिर्गक विपत्तीचा सामना करताना प्रभावी उपाय योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नदीपात्रालगतची पाण्याच्या प्रवाहाला अडथळा रूप मानवनिर्मित अडथळे हटवून पूररेषा निश्चित करून संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. प्रशासकीय व्यवस्थेची डोळे झाकही काही अंशी अशा संकटांना खतपाणी घालणारी असल्याची भावना राहिवाशांच्या मनात घर करून आहे. लाखो रुपये खर्च करून घरे विकत घेणारे खंडेराववासीय आज ही मूलभूत सुविधा व सुरक्षिततेच्या विवंचनेत असल्याने या समस्यांच्या निराकरणेच्या प्रतीक्षेत खंडेराववासीय आहेत (वार्ताहर)

Web Title: Permanent solution needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.