शहरातील कार्यक्रमांना पोलीस आयुक्तांची परवानगी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:18 AM2021-02-27T04:18:46+5:302021-02-27T04:18:46+5:30
नाशिक :शहरातील विविध प्रकारची आंदोलने, मोर्चे, मिरवणुका, मेळावे, धरणे, शोभायात्रा, धार्मिक दिंडी , रास्ता रोको, सर्व प्रकारच्या खेळाच्या ...
नाशिक :शहरातील विविध प्रकारची आंदोलने, मोर्चे, मिरवणुका, मेळावे, धरणे, शोभायात्रा, धार्मिक दिंडी , रास्ता रोको, सर्व प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा , विवाह सोहळे आदी विविध कार्यक्रमांच्या परवानगीसाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात विशेष शाखा अंतर्गत ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व प्रकारचे मोर्चे, मिरवणूका, मेळावे, धरणे, आंदोलने, शोभायात्रा, धार्मिक दिंडी, रास्ता रोको, व इतर कोणत्याही प्रकारच्या जमावास, क्रीडा विषयक सर्व स्पर्धा तसेच सार्वजनिक व खाजगी ठिकाणी आयोजित करण्यात येणारे सर्व मेळावे, रंगभुमी विषयक प्रयोग, पुस्तक मेळावा, प्रदर्शने, सेल , व इतर प्रयोग आदी विविध कार्याक्रमांसाठी शहर पोलीस आयुक्त यांची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा सर्व प्रकारच्या परवानग्या पोलीस आयुक्त कार्यालय स्तरावरील विशेष शाखेद्वारे देण्यात येणार असून त्यासाठी पोलीस आयुक्तालयात 'एक खिडकी' योजना सुरू करण्यात आली आहे. कार्यकमाच्या परवानगीसाठी पोलिसांडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या नमुना अर्जात माहिती भरून द्यावी लागणार आहे.