सिरो टेस्टसाठी मनपा घेणार एथिकल प्रॅक्टिसची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:10+5:302020-12-30T04:19:10+5:30
सिरो टेस्टसाठी महापालिका औरंगाबाद येथील डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन घेत असून त्यांनी गेल्याच आठवड्यात महापालिकेत भेट देऊन अधिकाऱ्यांशी ...
सिरो टेस्टसाठी महापालिका औरंगाबाद येथील डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन घेत असून त्यांनी गेल्याच आठवड्यात महापालिकेत भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अशाप्रकारच्या सिरो टेस्टसाठी महापालिकेचे एकूण क्षेत्र, त्यातील लोकसंख्या, त्यातही झोपडपट्टी भागातील लोेकसंख्या आणि नागरी भागातील लोकसंख्या असे अनेक प्रकारची माहिती घेतल्यानंतर सँपल सर्व्हे किती नागरिकांचा घ्यायचा हे निश्चित करण्यात येणार आहे. परंतु त्यापूर्वी अशाप्रकारे चाचणी करताना एखाद्या नागरिकाचा रक्त नमुना घेतल्यानंतर त्याचा वापर कशासाठी करायचा आहे, त्यातून कोणते व्यापक जनहित साधले जाणार आहे, यासंदर्भातील प्रस्ताव एथिकल कमिटीकडे पाठवला जातो. राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कमिट्या असल्या तरी नाशिकमध्ये जवळच्या जवळ म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यांच्या परवानगीनंतर सिरो टेस्टची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे.
इन्फो..
नाशिक शहरात दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली असली तरी सध्या ही संख्या मर्यादित आहे. मात्र, त्यानंतरही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत सिरो टेस्टचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.