नाशिकमध्ये विवाह सोहळ्यांसाठी परवानगीची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:14 AM2020-12-24T04:14:18+5:302020-12-24T04:14:18+5:30
चौकट - अशी आहे नियमावली विवाह सोहळ्यावेळी मिरवणूक काढण्यास बंदी असून शक्यतो बॅण्ड न लावण्याच्या सूचना आहेत. मंगल कार्यालयांमध्ये ...
चौकट -
अशी आहे नियमावली
विवाह सोहळ्यावेळी मिरवणूक काढण्यास बंदी असून शक्यतो बॅण्ड न लावण्याच्या सूचना आहेत. मंगल कार्यालयांमध्ये मुक्कामी राहण्यास बंदी असून हळदी समारंभ असल्यास रात्री ९ वाजेपर्यंत तो उरकला जातो. मंगल कार्यालयात सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
चौकट -
साधा अर्जही ठरतो पुरेसा
नाशिक शहरात विवाह सोहळ्यांसाठी कोणतीही परवानगी बंधनकारक नाही. दक्षतेचा भाग म्हणून काही वधू-वर पिता स्थानिक पोलीस स्टेशनला एक लेखी अर्ज देऊन सोबत लग्नपत्रिका जोडून संबंधित पोलीस स्टेशनला विवाह सोहळ्याची माहिती देतात. विवाह सोहळ्यांना ५० वऱ्हाडींच्या उपस्थितीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली असल्याने त्याबाबत काळजी घेतली जात असून, मंगल कार्यालयात गर्दी होणार नाही याची दक्षता लॉन्सचालक आणि वधू-वर पित्याकडून घेतली जाते.
कोट -
आमच्याकडे विवाह सोहळा झाला. सोहळ्यात सर्व वऱ्हाडींनी मास्कचा वापर करून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले. उपस्थितांची संख्याही मर्यादित असल्यामुळे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडले. - रमेश अहिरे, वरपिता
कोट -