औषधी कंपन्यांमध्ये १२ तास कामाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:04+5:302021-05-28T04:12:04+5:30
कोरोना महामारीत गेल्या दीड वर्षांपासून फार्मास्युटीकल उद्योगांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. या उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढविली आहे. ...
कोरोना महामारीत गेल्या दीड वर्षांपासून फार्मास्युटीकल उद्योगांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. या उद्योगांनी आपली उत्पादन क्षमता वाढविली आहे. त्यामुळे कामगारांची कमतरता भासत आहे. म्हणून आहे त्या कामगारांना अधिक तास काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन फार्मास्युटीकल अलायन्सने शासनाकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून शासनाने १२ तास काम करण्याची परवानगी दिली आहे. राज्यातील कोविड या संसर्गजन्य साथरोगाची परिस्थिती विचारात घेऊन कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ६५ (२) नुसार ज्या कारखान्यांमध्ये कामगारांची कमतरता भासत असेल, अशाच कारखान्यांना दि.३० जूनपर्यंत कारखान्यांना उपलब्ध कामगारांकडून १२ तासांच्या दोन पाळ्यांमध्ये कारखाना चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अटी व शर्ती
कामगारांना दुप्पट दराने वेतन देण्यात यावे. कामगारांच्या सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कामाचे तास १२ तासांपेक्षा जास्त नसावेत. आठवड्यात कामाचे तास ६० पेक्षा अधिक नसावेत.