धारदार शस्त्र बाळगणाऱ्या परप्रांतीय युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:12 AM2019-03-11T01:12:50+5:302019-03-11T01:13:42+5:30
बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे तसेच जमाव जमवून जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे गुन्हा असून, रासबिहारी लिंकरोडवरील मानेनगर परिसरात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एका परप्रांतीय युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिक : बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे तसेच जमाव जमवून जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे गुन्हा असून, रासबिहारी लिंकरोडवरील मानेनगर परिसरात धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एका परप्रांतीय युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित नूरआलम हाशमी (२४, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. कोणार्कनगर) हा संशयित युवक धारदार चॉपर सोबत बाळगून रात्रीच्या सुमारास रासबिहारी लिंकरोडवरील मानेनगर परिसरातून वावरत असताना म्हसरूळ पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यास हटकवून थांबविले व अंगझडती घेतली असता त्याच्याकडे धारदार चॉपर आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील पंचवटीसह विविध उपनगरांमध्ये गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे़