मालेगावी तीन विवाहितांचा छळ, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:27+5:302021-07-04T04:10:27+5:30

हार्डवेअर दुकान टाकण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या राहुल अशोक बुगलिया, अशोक शंकर बुगलिया, ...

Persecution of three married women in Malegaon, case filed against father-in-law's congregations | मालेगावी तीन विवाहितांचा छळ, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगावी तीन विवाहितांचा छळ, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

Next

हार्डवेअर दुकान टाकण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या राहुल अशोक बुगलिया, अशोक शंकर बुगलिया, रेखा अशोक बुगलिया, किशोर शंकर बुगलिया, राखी नंदलाल चौधरी यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काजल राहुल बुगलिया या विवाहितेने फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार खांडेकर हे करीत आहेत.

------------------------

छावणी पोलिसांत गुन्हा

माहेरून चार लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सात जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पायल दिनेश पवार या विवाहितेने फिर्याद दिली आहे. दिनेश गोवर्धन पवार, गोवर्धन बाबूलाल पवार, वत्सलाबाई गोवर्धन पवार, अविनाश गोवर्धन पवार, मनीषा अविनाश पवार, सुनील शाहू राठोड, सुनीता सुनील राठोड यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

------------------------

मालेगावी अल्पवयीन मुलीला पळविले

मालेगाव : येथील टीव्ही सेंटर परिसरात राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. अज्ञात इसमाने फूस लावून त्यांच्या मुलीला पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार एस. आर. पवार करीत आहेत.

--------------------------

बँकेचा धनादेश चोरणाऱ्याविरुद्ध गुन्हा

मालेगाव : घरातून बँकेचा ५० हजार रुपयांचा धनादेश चोरून पैसे काढल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रिजवान अहमद मोहम्मद अहमद यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा पुतण्या इसतीयाक अहमद मोहम्मद उमर याने घरातून धनादेशाची चोरी करून धनादेश बँकेत वटवून रक्कम काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार एस. पी. कदम करीत आहेत.

Web Title: Persecution of three married women in Malegaon, case filed against father-in-law's congregations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.