किरकोळ कारणावरून महिलेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:19 PM2021-07-31T18:19:44+5:302021-07-31T18:20:41+5:30

मालेगाव:- किरकोळ कारणावरून कुरापत काढून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निर्मला दादाजी बागुल या महिलेने फिर्याद दिली आहे.

Persecution of a woman for petty reasons | किरकोळ कारणावरून महिलेचा छळ

किरकोळ कारणावरून महिलेचा छळ

Next
ठळक मुद्देपिकअपसाठी छळ

मालेगाव:- किरकोळ कारणावरून कुरापत काढून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निर्मला दादाजी बागुल या महिलेने फिर्याद दिली आहे. तिचा पती दादाजी पुंजाराम बागुल , अलका दादाजी बागुल ,आक्काबाई पुंजराम बागुल रा. नाकोडा ता. कळवण यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास हवालदार एस एस अहिरे करीत आहेत.

विवाहितेचा मानसिक छळ
मालेगाव:- विवाहितेचा चारित्र्याचा संशय घेऊन शारीरिक मानसिक छळ करणाऱ्या तिघीजनांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी भाग्यश्री प्रभाकर बागुल या विवाहितेने फिर्याद दिली आहे तिचा पती प्रभाकर निंबा बागुल ,निंबा देवराम बागुल, लता देवराम बागुल यांनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास हवालदार एस बी बच्छाव हे करीत आहेत

पिकअपसाठी छळ
मालेगाव:- पिकप घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या चार जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शितल बाळासाहेब देवरे या विवाहितेने फिर्याद दिली आहे तिचा पती बाळासाहेब वसंत देवरे अंजनाबाई वसंत देवरे, वसंत देवरे अण्णा देवरे सर्व राहणार एरंडगाव यांनी पिकअप विकत घेण्यासाठी बाहेर पैसे आणावेत म्हणून छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे
 

Web Title: Persecution of a woman for petty reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.