मनमाड महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:15 AM2018-02-25T00:15:07+5:302018-02-25T00:15:07+5:30

योग्य ती ध्येय निश्चिती, सकारात्मक विचार, दैनंदिन व्यायाम यातून बालपणापासूनच आपले सर्वांगीण व्यक्तिमत्त्व फुलत जाते, असे मत उद्योजक स्वाती गुजराथी यांनी व्यक्त केले. मनमाड कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे उपस्थित होते.

 Personality Workshop in Manmad College | मनमाड महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व कार्यशाळा

Next

मनमाड : योग्य ती ध्येय निश्चिती, सकारात्मक विचार, दैनंदिन व्यायाम यातून बालपणापासूनच आपले सर्वांगीण व्यक्तिमत्त्व फुलत जाते, असे मत उद्योजक स्वाती गुजराथी यांनी व्यक्त केले. मनमाड कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे उपस्थित होते.  विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. योगीता उशीर यांनी प्रास्ताविकेतून उपक्रमाचा हेतू विशद केला. मान्यवरांचा परिचय प्रा. कविता काखंडकी यांनी करून दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आत्मविश्वा-साच्या माध्यमातून विविध गुणांचा विकास केला पाहिजे, असे मत भामरे यांनी व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. डी. जी. जाधव यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सर्वांगीण विकासाचे विविध टप्पे कसे गाठता येतील, याबद्दल विविध उदाहरणांद्वारे माहिती दिली. प्रा. शरद वाघ यांनी स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.

Web Title:  Personality Workshop in Manmad College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.