स्थायीचा विरोध डावलून पेस्ट कंट्रोलचा ठेका
By Admin | Published: August 1, 2016 12:44 AM2016-08-01T00:44:02+5:302016-08-01T00:44:47+5:30
दणका : मंगळवारपासून नवीन ठेकेदार
नाशिक : महापालिकेत सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याची मुदत शनिवारी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा मुदतवाढ न देता शासनाच्या आदेशान्वये माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी निविदा प्रक्रियेनुसार मे. दिग्विजय एंटरप्रायझेसला ठेका देण्याचा निर्णय घेतला असून, येत्या २ आॅगस्टपासून नवीन ठेकेदाराच्या हाती पेस्ट कंट्रोलची सूत्रे जाणार आहेत. सदर ठेकेदाराला पेस्ट कंट्रोलचा ठेका देण्यास स्थायी समितीने कडाडून विरोध केला होता.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पेस्ट कंट्रोलचा ठेका मुदतवाढीतच अडकून पडला होता. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत सुमारे २० कोटी रुपयांचा ठेक्याचा प्रस्ताव तयार करत त्यासंबंधी निविदाप्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये मे. दिग्विजय एंटरप्रायझेस या मक्तेदाराची न्यूनतम दराची निविदा प्राप्त झाली होती. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीवर ठेवला होता. मात्र शहरात तीन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे २० कोटी रुपयांचा डास प्रतिबंधक पेस्ट कंट्रोलचा प्रस्ताव अनेक त्रुटी असल्याने स्थायी समितीने ६ आॅगस्ट २०१५ रोजी फेटाळून लावला होता. सदर प्रस्तावामुळे ठेकेदाराला अनावश्यक जादा रक्कम जाऊन महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने फेरनिविदा काढण्याचा