आटकवडे येथे महिला शेतकऱ्यांना कीटकनाशक हाताळणीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:27 PM2020-07-01T18:27:03+5:302020-07-01T18:27:37+5:30

सिन्नर : तालुक्यातील आटकवडे येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व खरीप हंगामाच्या सुरवातीला कीटकनाशके फवारणी करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचे प्रशिक्षण व कोरोना विषाणू पासून संसर्ग टाळण्यासाठी शेतकº­यांनी घ्यावयाची काळजी याबाबत चा उपक्रम कॉर्टिवा अ‍ॅग्रीसायन्सच्या प्रकल्प समन्वयक बी. गीताराणी यांनी मार्गदर्शन केले.

Pesticide handling training for women farmers at Atakwade | आटकवडे येथे महिला शेतकऱ्यांना कीटकनाशक हाताळणीचे प्रशिक्षण

आटकवडे येथे महिला शेतकऱ्यांना कीटकनाशक हाताळणीचे प्रशिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देशेती शाळेत माहिती देऊन प्रात्यक्षिक सादर केले.

सिन्नर : तालुक्यातील आटकवडे येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर व खरीप हंगामाच्या सुरवातीला कीटकनाशके फवारणी करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचे प्रशिक्षण व कोरोना विषाणू पासून संसर्ग टाळण्यासाठी शेतकº­यांनी घ्यावयाची काळजी याबाबत चा उपक्रम कॉर्टिवा अ‍ॅग्रीसायन्सच्या प्रकल्प समन्वयक बी. गीताराणी यांनी मार्गदर्शन केले.

कीटकनाशके खरेदी करताना मान्यता प्राप्त, परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत, खरेदी करतांना पक्के बिल जरूर घ्यावे व फवारणी करताना शेतकरी बंधूनी कीटकनाशकातून विषबाधा होणार नाही यावर लक्ष केंद्रित करावे. कीटकनाशके हाताळताना व फवारणी करताना योग्य काळजी घेण्याचे बी. गीताराणी यांनी आवाहन केले. फवारणी करताना आवश्यक किट पीपीई कीट, कॅप, ग्लोज, अप्रोन, इत्यादी चे वापराचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले. सदर कार्यक्रम दरम्यान अर्चना चौधरी यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना कामगंध सापळे याचा वापर करण्याबाबत शेती शाळेत माहिती देऊन प्रात्यक्षिक सादर केले.
सदर उपक्रमात ३३ महिला शेतकº­यांना मास्क, माहिती पत्रक व प्रातिनिधिक स्वरूपात सोडत पद्धतीने एका शेतकº­यास फवारणी करताना आवश्यक किट (पीपीई कीट) कॅप, ग्लोज, अप्रोनचे वाटपही करण्यात आले.याप्रसंगी सरपंच मंगला गांगुर्डे, उपसरपंच दत्तात्रय वाघ, पोलीस पाटील मच्छिंद्र आव्हाड, रामकृष्ण वाघ, रंगनाथ वाघ, भगवान वाघ, योगेश वाघ आदींसह महिला व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Pesticide handling training for women farmers at Atakwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.