पेठ महामार्गावर अखेर टाकले गतिरोधक, वेगावर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:05 PM2020-06-13T21:05:43+5:302020-06-14T01:34:04+5:30
पेठ : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांनी केलेली मागणी ‘लोकमत’मधून ठळक प्रसिद्ध झाल्याने अखेर पेठ शहरात जवळपास सात ते आठ ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले असून, यामुळे धावत्या वाहनांच्या वेगाला ब्रेक लागला आहे.

गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ पेठ शहराच्या मुख्य बाजारपेठेतून जात असल्याने वेगवान धावणाºया वाहनांमुळे अनेक अपघात झाले असून, याबाबत पेठ शहरातील सर्वपक्षीय नागरिक व पदाधिकारी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे निवेदन देऊन गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. याबाबतचे वृत्त लोकमतमधून प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित प्रशासनाने दखल घेत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक टाकले आहेत.
-----------------------------------
पेठ शहरातून जाणाºया बलसाड रोडवर प्राथमिक शाळा, ग्रामीण रु ग्णालय, नगरपंचायत कार्यालय, बॅँका व सार्वजनिक दुकाने असल्याने नेहमीच असणाºया गर्दीतून अवजड वाहनांना मार्गक्र मण करावे लागत आहे. गतिरोधक बसविल्याने अपघातांवर नियंत्रण मिळू शकेल.
- मनोज घोंगे, नगराध्यक्ष, पेठ