पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरला सर्वाधिक मतदान
By admin | Published: February 23, 2017 12:34 AM2017-02-23T00:34:15+5:302017-02-23T00:34:29+5:30
पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरला सर्वाधिक मतदान
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवारी (दि.२१) झालेल्या ७३ गट व १४६ गणांसाठी सरासरी ६९ टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ६.८० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या आदिवासी भागात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असून, सर्वांत कमी मतदानाची नोंद बागलाण तालुक्यात झाली आहे. जिल्ह्णात एकूण २४ लाख २६ हजार ७३५ मतदार होते. त्यात ९ लाख ६ हजार पुरु ष तर ७ लाख ६७ हजार महिला असे एकूण सुमारे १६ लाख ७४ हजार ५०५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
तालुकानिहाय मतदान पुढीलप्रमाणे- बागलाण तालुक्यातील २४६ मतदान केंद्रावर एकूण २,३३,३५३ मतदारांपैकी १,४६,३१२ (सर्वात कमी ६२.७० टक्के), मालेगाव तालुक्यातील २७७ मतदान केंद्रांवर २,७१,४७२ मतदारांपैकी १,७७,८८८ (६५.५३), देवळा तालुक्यातील ८९ मतदान केंद्रांवर ९४, ८१५ मतदारांपैकी ६३,८४३ (६७.३३), कळवण तालुक्यातील १५५ मतदान केंद्रांवर १,१७,९८७ मतदारांपैकी ८५.३३६ (७२.३३), सुरगाणा तालुक्यातील १५८ मतदान केंद्रांवर १,१४, ३५४ मतदारांपैकी ७९,६५७ (६९.६६), पेठ तालुक्यातील एकूण ८३ मतदान केंद्रांवर ७३,०३५ पैकी ५५,९२३ (सर्वाधिक ७६.५७), दिंडोरी तालुक्यातील २०८ मतदान केंद्रांवर १,९३,२४१ मतदारांपैकी १,४२६,२८ (७३.८१), चांदवड तालुक्यातील १५३ मतदान केंद्रांवर १,४३,७१७ मतदारांपैकी ९७,७२१ (६८.००), नांदगाव तालुक्यातील १४७ मतदान केंद्रांवर १,३१,७९२ मतदारांपैकी ८३,५७९ (६३.४२), येवला तालुक्यातील १६७ मतदान केंद्रांवर १,५०,६०४ मतदारांपैकी १,०९,१८६ (७२.५०), निफाड तालुक्यातील ३३९ मतदान केंद्रांवर ३,२८,५६२ मतदारांपैकी २,३०,५१८ (७०.१६), नाशिक तालुक्यातील १३० मतदान केंद्रांवर १,२९,४२७ मतदारांपैकी ९१,००५ (७०.३१.), त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ११५ मतदान केंद्रांवर ९६,०८४ मतदारांपैकी ७०,८३९ (७३.७३), इगतपुरी तालुक्यातील १६६ मतदान केंद्रांवर १,५०,६७२ मतदारांपैकी १,०५,१९७ (६९.८२), सिन्नर तालुक्यातील २१३ मतदान केंद्रांवर १,९७,६२० मतदारांपैकी १,३४,८७३ (६४.२५) असे ६९ टक्के मतदान झाले आहे. सन २०१२ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा बागलाण तालुक्यात २.५७ व सुरगाणा तालुक्यात १०.३४ टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. तर मालेगाव ६.४१, देवळा ३.०५ ,कळवण ०.६०, पेठ २.८६, दिंडोरी १.१०, चांदवड ३.१०, नांदगाव ११.०४, येवला ७.१३, निफाड ११.६८, नाशिक ९.४१ त्र्यंबकेश्वर ६.३४, इगतपुरी ०.११ तर सिन्नर तालुक्यात ७.११ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)