पेठ, सुरगाण्यात ‘कुपोषण मुक्तीचा’ पायलट प्रोजेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:24+5:302021-08-14T04:19:24+5:30

शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विविध विषयांच्या अनुषंगाने दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेण्यात ...

Peth, Surganya ‘Malnutrition Free’ Pilot Project | पेठ, सुरगाण्यात ‘कुपोषण मुक्तीचा’ पायलट प्रोजेक्ट

पेठ, सुरगाण्यात ‘कुपोषण मुक्तीचा’ पायलट प्रोजेक्ट

googlenewsNext

शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विविध विषयांच्या अनुषंगाने दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. ते पुढे म्हणाले, सर्व जिल्ह्यांनी शोधमोहिमेसंदर्भात सूक्ष्म नियोजन करून या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच या मोहिमेच्या संनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांच्या नियुक्ती करून मोहीम सुरू करण्यापूर्वी तालुकास्तरावरील पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. याबरोबरच बालकांची आरोग्य तपासणी तसेच किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केल्या.

चौकट===

‘माझी वसुंधरा’चा दुसरा टप्पा

‘माझी वसुंधरा’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक विभागाने राज्यात सर्व प्रथम येण्याचा मान मिळविला होता. त्यानुषंगाने दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील ७७, अहमदनगर ९९, धुळे ३२, जळगाव ४६, नंदुरबार १५ असे एकूण २६९ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला असून, या गावांचा कृती आराखडा तयार करण्यात यावा. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरून कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.

चौकट===

जलजीवन मिशनची अंमलबजावणी

जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीतून सर्व ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई प्रति दिन किमान ५५ लिटर पाणी पुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलजीवन मिशनची अंमलबजावणी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

Web Title: Peth, Surganya ‘Malnutrition Free’ Pilot Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.