पेठ तालुक्यात ‘प्रशासन आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 04:07 PM2019-02-05T16:07:40+5:302019-02-05T16:07:51+5:30
फणसपाडा : शासकीय योजनांच्या लाभाचे वाटप
पेठ : यशोदीप बहुद्देशीय सर्वांगीण विकास सेवा संस्था, ग्रामपंचायत कोपूर्ली व राजस्व अभियान तहसील कार्यालय पेठ यांचे संयुक्त विद्यमाने फणसपाडा येथे ‘प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्र म राबवण्यात आला.
शासनस्तरावर सामान्य जनतेसाठी विविध शासकीय योजना कार्यान्वित करण्यात येत असतात. मात्र सर्वच योजना सामान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचतातच असे नाही. यासाठी पेठ तालुक्यातील फणसपाडा ही जन्मभूमी असलेले सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट यांच्या संकल्पनेतून यशोदीप संस्थेच्या वतीने ‘प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्र म राबवण्यात आला. यामध्ये महसूल विभाग, कृषी, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, बालविकास आदी विभागातंर्गत येणाऱ्या शासकिय योजनांची माहिती व लाभाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार हरीष भामरे, सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, पंचायत समिती सदस्य विलास अलबाड, पद्माकर कामडी, रामदास वाघेरे, यशोदीपचे अध्यक्ष गिरीश गावीत, देवदत्त चौधरी, रमेश महाले यांचेसह तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. रमेश चौधरी यांनी सूत्रसंचलन केले.