पेठ तालुका- कोटंबी घाटात अवजड ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:27+5:302021-07-31T04:15:27+5:30
शुक्रवारी (दि.३०) रोजी पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात अहमदाबादहून बंगळुरूकडे तूर डाळ वाहतूक करणारा ट्रक क्रमांक ...
शुक्रवारी (दि.३०) रोजी पेठ तालुक्यातील कोटंबी घाटात अहमदाबादहून बंगळुरूकडे तूर डाळ वाहतूक करणारा ट्रक क्रमांक केए-०४ एबी-३३५६ एका वळणावर ब्रेक फेल झाल्याने चालक दयामाणा गदयाप्पा हेजेकर (२२), रा. चव्हाबावी, ता. मुद्देबिहार, जि. बिजापूर, राज्य कर्नाटक याचा ताबा सुटल्याने सुरक्षा रक्षक भिंतीवर जाऊन आदळल्याने पलटी झाला. यामध्ये ट्रकचे ऑइल रस्त्यावर सांडल्याने काही काळ येणारी वाहने सरकू लागली होती. मात्र, परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर माती टाकल्याने पुढील अनर्थ टळला. पेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी वाहनासह आतील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे एकाच वळणावर हा चौथा ट्रक पलटी झाल्याने वाहनधारकांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घाटात ज्या ठिकाणी लोखंडी कठडे बांधले आहेत तेथे भक्कम संरक्षक भिंती बांधण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
-----------------------
कोटंबी, ता. पेठ घाटात पलटी झालेला ट्रक. (३० पेठ १)
300721\30nsk_31_30072021_13.jpg
३० पेठ १