पेठ तालुकास्तरीय जि.प. अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:14 AM2018-02-25T00:14:18+5:302018-02-25T00:14:18+5:30
जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अध्यक्ष व सभापती चषक कला, क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाल्या. तालुकास्तरावर प्रथम येणाºया स्पर्धकांना जिल्हास्तरीय सहभागाची संधी मिळणार आहे.
पेठ : जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अध्यक्ष व सभापती चषक कला, क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाल्या. तालुकास्तरावर प्रथम येणाºया स्पर्धकांना जिल्हास्तरीय सहभागाची संधी मिळणार आहे. आश्रमशाळा पेठ येथील प्रांगणात झालेल्या दोन दिवसीय स्पर्धांचे उद्घाटन सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते करण्यात आले, तर जि.प. सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष लता सातपुते, उपसभापती तुळशीराम वाघमारे, सदस्य पुष्पा पवार, नंदराम गवळी, विठ्ठल गवळी उपस्थित होते. केंद्रप्रमुख एम.एच. सहारे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख, मुख्या-ध्यापक, प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, परीक्षक, शिक्षक, विषयतज्ज्ञ, विद्यार्थी खेळाडू मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. गटशिक्षणाधिकारी वसंत खैरनार यांनी आपल्या प्रास्ताविकात आदिवासी मुलांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांची गरज असल्याचे सांगतानाच याच स्पर्धांच्या माध्यमातून नाचलोंढी शाळेची वर्षा चौधरी राष्ट्रीय पातळीवर झेप घेऊ शकल्याचे त्यांनी सांगितले.