प्लॅस्टीक बंदीसाठी पेठ तालुका सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:00 PM2018-08-04T13:00:03+5:302018-08-04T13:00:21+5:30
रामदास शिंदे पेठ- स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला पेठ तालुक्यात प्रारंभ झाला असून शासकिय अधिकाऱ्यांसह कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य, अंगणवाडी आदींनी या अभियानात सक्रि य सहभाग घेतल्याने लवकरच पेठ तालुका संपुर्ण प्लास्टिक मुक्त घोषीत होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
रामदास शिंदे
पेठ- स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला पेठ तालुक्यात प्रारंभ झाला असून शासकिय अधिकाऱ्यांसह कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य, अंगणवाडी आदींनी या अभियानात सक्रि य सहभाग घेतल्याने लवकरच पेठ तालुका संपुर्ण प्लास्टिक मुक्त घोषीत होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पेठ तालुक्यात मोठी गावे वगळता वाडीवस्तीवर प्लास्टिकचा वापर तसा अभावानेच होतो.निसर्गाशी जुळवून घेतलेल्या जनतेने त्याच्या संरक्षणाचीही जबाबदारी घेतल्यास पर्यावरण रक्षणाचे मोठे काम होणार असल्याने दिनांक १ आॅगष्टपासून तालुक्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात आले आहे. यातंर्गत चार दिवसात क्षेत्रिय अधिकार्यच्या मार्फत जवळपास २०० प्राथमिक शाळांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर कचरा व प्लॅस्टिक संकलनाचे नियोजन करण्यात आले असून गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व विभागाच्या खाते प्रमुखांची संयुक्त कार्यशाळा घेण्यात आली. स्वच्छ भारत आभियान गटसाधन केंद्राकडून दिलेल्या नियोजनानुसार प्लास्टिक संकलन करण्यात येणार असून संपुर्ण प्लॅस्टिक मुक्तीची जनजागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
-----------------------
जनतेसह लोकप्रतिनिधींचाही सहभाग
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शासकिय यंत्रणेसह लोकप्रतिनिधी, राजकिय पक्षांचे प्रतिनिधी, सरपंच व सदस्य, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समतिी अध्यक्ष व सदस्य आदींचाही सहभाग घेण्यात आला आहे. गाविनहाय समित्यांची स्थापना करून प्रथम जनजागृती, संकलन व त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने आता प्लॅस्टिक बंदीची लढाई आर या पार होणार असल्याचे दिसून येते.
-----------------------
स्वतंत्र अॅपची निर्मिती
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणावर उपयोग करून घेण्यात आला असून सहभागासाठी अॅपलीकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्य जनतेसह कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी नी सदरचे अॅप डाऊनलोड करून या अभियानात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पेठ तालुक्यात जवळपास २०० गावे, ७३ ग्रामपंचायत, २३० शाळा असून गावस्तरावर विविध उपक्र म राबवून प्लॅस्टिकचे संकलन, विलीणीकरण व विद्यटनाची प्रक्रि या समजून सांगितली जात आहे.