पेठ तालुका तौलिक महासंघाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:39 PM2021-07-02T16:39:47+5:302021-07-02T16:39:55+5:30
पेठ : स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पेठ तालुका तौलिक महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात ...
पेठ : स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पेठ तालुका तौलिक महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. शुक्रवार (दि. २) रोजी जुने तहसील कार्यालय आवारात तालुकाध्यक्ष कांतीलाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासंदर्भात इतर मागासवर्गीय समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. नायब तहसीलदार सुदेश निरगुडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मनोज घोंगे, संतोष डोमे, महेंद्र पेठकर, चेतन निखळ, गणेश शिरसाठ, श्याम गावीत, तुळशीराम वाघमारे, राजू कर्पे, याकूब शेख, राहुल गाडगीळ, भरत पगारे, अतुल शिरसाठ, अनिल घोंगे, विकास बिरार, रवि करवंदे यांचे सह तौलिक महासंघाचे पदाधिकारी व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.