पेठ : संतप्त विद्यार्थिनींनी गाठले तहसील कार्यालय; सुरक्षितता वाºयावर मुलींचे वसतिगृह समस्यांच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:36 PM2018-01-16T23:36:47+5:302018-01-17T00:22:09+5:30
पेठ : येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींना समस्यांचा सामना करावा लागत असून, गैरसोयींनी त्रस्त विद्यार्थिनींनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून थेट तहसील कार्यालय गाठून समस्यांचा पाढा वाचला
पेठ : येथील आदिवासी विकास विभाग संचलित मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, गैरसोयींनी त्रस्त झालेल्या विद्यार्थिनींनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून थेट तहसील कार्यालय गाठून समस्यांचा पाढा वाचला. गृहपालाची नियमित गैरहजेरी, दूषित पाण्याचा पुरवठा, अस्वच्छतेमुळे आजाराच्या प्रमाणात वाढ, निकृष्ट प्रकारचे जेवण, गृहपाल व ठेकेदाराकडून अपमानास्पद वागणूक, दंडाच्या नावाने अनधिकृत रकमांची वसुली आदी समस्या तहसीलदार हरीश भामरे यांना दिलेल्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रसंगी जि. प. सदस्य भास्कर गावित, सदस्य विलास अलबाड, युवा सेना उपजिल्हाप्रमुख मोहन कामडी, किरण भुसारे, नगराध्यक्ष लता सातपुते, आदिवासी विकास परिषदेचे विभागीय अध्यक्ष लकी जाधव, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गवळी, तालुकाध्यक्ष युवराज भोये, नगरसेवक प्रतिभा पाटील, कुमार मोंढे, प्रकाश धुळे, राजेंद्र कहाणे, राजेश पाटील, भूषण कामडी, शैलेश राऊत, अमोल तलवारे, सागर कुंभार यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हरीश भामरे यांनी तत्काळ दखल घेत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांना चौकशी करण्याबाबत निर्देश दिले. मात्र आदिवासी विकास विभागाने ठोस भूमिका न घेतल्याने सायंकाळी मुलींनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर बैठा सत्याग्रह करीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. गृहपालावर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही न घेण्याचा मुलींनी पवित्रा घेतला होता.
दूषित पाण्याचा होतो पुरवठा
येथील शासकीय वसतिगृहाला ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो त्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने ऐन थंडीत मुलींना कुडकुडत राहावे लागत आहे. गृहपाल वारंवार गैरहजर राहत असल्याने शेकडो मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
आला आहे.