पेठला सेना-कॉँग्रेसची आपलं पॅनलच्या मेळाव्याला हजेरी
By admin | Published: June 30, 2015 11:34 PM2015-06-30T23:34:39+5:302015-06-30T23:35:25+5:30
पेठला सेना-कॉँग्रेसची आपलं पॅनलच्या मेळाव्याला हजेरी
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचार तापू लागला असून, काल (दि.३०) विरोधी शेतकरी विकास पॅनलचे त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन ठिकाणी मेळावे झाले, तर सत्ताधारी आपलं पॅनलच्या वतीने पेठ तालुक्यातील मतदारांसाठी पेठला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पेठ तालुक्यातील सहकारी संस्थांवर प्रभुत्व असलेल्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित व कॉँग्रेसचे नेते जिल्हा बॅँक संचालक नामदेव हलकंदर यांनी आपलं पॅनलच्या मेळाव्याला हजेरी लावल्याने विरोधी शेतकरी विकास पॅनल व युतीच्या पॅनलला धक्का बसल्याचे चित्र आहे. पेठच्या मेळाव्यात बोलताना माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी सांगितले की, पेठ तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी व मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकल्यानेच हा मेळावा घेण्यात आला आहे. तसेच आपण येत्या पाच वर्षांत पेठला उपबाजार देण्याबाबत आग्रही भूमिका घेऊ. बाजार समितीत गुंडप्रवृत्तीचे लोक आल्यावर त्याचा शेतकऱ्यांनाच त्रास होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आपलं पॅनलची निर्मिती केली आहे. यावेळी जयश्री वाघमारे, भिकाजी चौधरी, तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, विनायक माळेकर, हिरामण खोसकर, विश्वास नागरे, भिकाजी पाटील, तानाजी पिंगळे, महेश टोपले, रावसाहेब मोरे, विमलताई जुंद्रे, रघुनाथ चौधरी, राजाराम धनवटे, भास्कर गोडसे, मंदाबाई चौधरी, मनोहर चौधरी, विठाबाई भोये, रामदास महाले, संतोष डोमे, श्याम गावित, संजय तुंगार, नितीन राऊत आदि उपस्थित होते.