पेठला रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 06:12 PM2018-10-25T18:12:56+5:302018-10-25T18:14:02+5:30
खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पेठ तालुका दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्याच्या यादीत पेठ तालुक्याचा समावेश नसल्याने संतापलेले शेतकरी व सर्वच राजिकय पक्षांच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी नाशिक - गुजरात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून पेठ तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली.
पेठ : खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पेठ तालुका दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्याच्या यादीत पेठ तालुक्याचा समावेश नसल्याने संतापलेले शेतकरी व सर्वच राजिकय पक्षांच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी नाशिक - गुजरात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून पेठ तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली.
दुपारी 12 वाजता पेठ शहरातील शहीद देवजी राऊत चौकात सत्ताधारी शिवसेनेसह इंदिरा कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, महाराष्ट्र नविनर्माण सेना, आरपीआय आदी राजिकय पक्षाचे पदाधिकारी व शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर ठिय्या मांडला. पेठ तालुक्यात या वर्षी खरीप हंगाम पुरता वाया गेला असून पावसाच्या अनियमतितेमुळे भात व नागालीची पिके नष्ट झाली आहेत. शासनाच्या दुष्काळाच्या निकषानुसार पेठ तालुक्यात सरासरी पाऊस झाला असला तरीही ऐन पिकांची दाणा भरणीत पाऊस गायब झाल्याने खरीप पिके वाया गेल्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार हरिष भामरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आमदार नरहरी झरिवाळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भास्कर गावीत, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष निवृत्ती महाले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, मनसेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, आरपीआयचे अशोक ताठे, डॉ. भारती पवार, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, भिका चौधरी, मनोहर चौधरी, शाम काळे, रामदास वाघेरे, शामराव गावीत, गिरीश गावीत, याकूब शेख, पुंडलिक महाले, विठाबाई महाले, नामदेव हलकंदर, दिलीप पाटील, गणेश शिरसाठ, विशाल जाधव, माकपाचे तालुकाध्यक्ष नामदेव मोहांडकर, डॉ. दत्तू पाडवी, जाकीर मनियार, समीर राजे. पुनम गवळी, यशोदा राऊत, शितल रहाणे, संतोष डोमे, गणेश गावीत, रंगनाथ वाडकर, यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. पोलीस निरिक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा
राष्ट्रीय महामार्गावर पुकारण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे जवळपास सहा तास वाहतूकीची कोंडी झाली. गुजरात व नाशिकच्या दिशेने अवजड वाहनासह बसेस व खाजगी वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या . राष्ट्रीय महामार्गाचे नुतणीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूकीत आधिकच अडथळे निर्माण झाले. वाहनचालक व प्रवाशांना मात्र तप्त उन्हात झाडाझुडपांचा आसरा घेत दिवस रस्त्यावरच काढावा लागला.
माकपाचा आंदोलनातून काढता पाय
एकीकडे पेठ शहरात सर्वपक्षीय रास्ता रोको सुरू असतांना माकपा व किसान सभेने रास्ता रोको आंदोलनापासून चार हात लांब राहत शहरानिजक असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिरात पक्षाची बैठक घेतली.आमदार जे.पी. गावीत यांनी बैठकीत माकपा व किसान सभेच्या कार्यकर्त्याना संबोधित केले. माकपाच्य ध्येय धोरणांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रारंभी माकपा आंदोलनात सहभागी होईल असे सांगितले जात असतांना अचानक आंदोलनाच्या दिवशी माकपाने दुर रहाणे पसंत केल्याने आंदोलन स्थळी राजिकय चर्चांना उधान आले होते. शिवाय राज्यात व देशात सत्ता असलेल्या भाजपाने मात्र आंदोलनात सहभाग घेतला नाही.
आमदार जे.पी. गावीत अखेरच्या क्षणी आंदोलन स्थळी दाखल
दिवसभर रास्तारोको आंदोलनापासून दुर असलेले माकपाचे आमदार जीवा पांडू गावीत यांनी शेवटच्या क्षणी माकपा पदाधिकारी व कार्य कार्यासह आंदोलन स्थळी हजेरी लावली.
वीज मंडळाचा केला निषेध
पेठ तालुक्यात दररोज 6 ते 8 तास भारिनयमन असून त्या व्यतिरिक्त वीज गायब होत असल्याने शेतकरी मेटाकूटीला आले असल्याने आंदोलन कर्त्यनी वीज वितरण कंपनीचा निषेध करून भारिनयमन रद्द करण्याची मागणी केली. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे काही शेतकर्यांना पाणी असून पिकांना देता आले नसल्याने वीज मंडळाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.