पेठरोडला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:13 AM2018-09-19T00:13:16+5:302018-09-19T00:13:35+5:30
पेठरोडवरील शाहूनगर झोपडपट्टीतील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़ १७) दुपारच्या सुमारास घडली़
नाशिक : पेठरोडवरील शाहूनगर झोपडपट्टीतील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़ १७) दुपारच्या सुमारास घडली़ राजेंद्र लहानू भगत (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेच्या सुमारास राजेंद्र भगत याने घरातील लाकडास टॉवेल बांधून गळफास घेतला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
सावत्र बापाकडून विनयभंग
घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा तिच्या सावत्र बापानेच विनयभंग करून अत्याचार केल्याची घटना अंबड परिसरात घडली आहे़ पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार २९ व ३० आॅगस्ट रोजी घरात झोपलेली असताना तिच्या सावत्र बापाने विनयभंग करून अत्याचार केला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरमालकाविरुद्ध गुन्हा
भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकाविरोधात गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ मुरलीधर ठाकरे (६०, रा. सोनाई निवास, सटाणा नाका, मालेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घरमालकाचे नाव आहे़ ठाकरे यांचा गंगापूर रोडवरील नरसिंहनगरमधील वैशाली अपार्टमेंटमध्ये फ्लॅट असून, तो शिवाजी अहिरे यांना भाडेतत्त्वावर दिला आहे़ मात्र, याची माहिती गंगापूर पोलिसांना दिली नाही, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बागवानपुरात जुगारी अड्ड्यावर छापा
बागवानपुरा परिसरात सुरू असलेल्या जुगारावर भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़ १७) सायंकाळी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाºया पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ महालक्ष्मी चाळ परिसरात काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार छापा टाकला असता संशयित सिद्धांत जगताप व त्याचे चार साथीदार पत्त्याच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या संशयितांकडून ६५० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले असून, जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़
वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
हॉटेलसमोर उभ्या असलेल्या वृद्धाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१७) सकाळी नाशिक-पुणे रोडवरील हॉटेल कामतसमोर घडली़ रामचंद्र आगादी ढगे (वय ६४, रा. भगतसिंग झोपडपट्टी, राणेनगर, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. रामचंद्र ढगे हे पुणे रोडवरील हॉटेल कामतसमोर उभे असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.