पेठला कोरोनामुळे निधीसह वसुलीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 AM2021-05-30T04:12:13+5:302021-05-30T04:12:13+5:30

पेठ : गत दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने नव्यानेच स्थापन झालेल्या पेठ नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिकला शासकीय निधीसह करवसुलीला ...

Pethla corona breaks recovery with funds | पेठला कोरोनामुळे निधीसह वसुलीला ब्रेक

पेठला कोरोनामुळे निधीसह वसुलीला ब्रेक

Next

पेठ : गत दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने नव्यानेच स्थापन झालेल्या पेठ नगरपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिकला शासकीय निधीसह करवसुलीला ब्रेक लागल्याने पावसाळापूर्वीच्या कामांची पूर्तता करताना नगरपंचायत प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.

पेठ तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने संभाव्य कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये शहरातील तलावातील गाळ काढणे, मुख्य व लहान गल्लीबोळातील गटारी स्वच्छता करणे, सांडपाण्याचा योग्य निचरा, पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण यंत्राची दुरुस्ती व देखभाल, बंद पडलेले दिवे अशी कामे आराखडयात नमूद करण्यात आली आहेत. शहरातील मोडकळीस आलेल्या घरांची पाहणी करून जवळपास १० घरमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नगरपंचायत प्रशासनाचा बहुतांश वेळ हा कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी खर्च झाला असून, दुसरी लाट ओसरू लागली असताना आता सर्वच विभागांनी पावसाळापूर्वीच्या कामांकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येते.

कोट...

पेठ नगरपंचायत अंतर्गत दरवर्षी पावसाळापूर्वीच्या कामांना मेअखेर सुरुवात केली जाते. कोरोनाकाळात नगरपंचायतीला मोठया प्रमाणावर आर्थिक फटका बसल्यामुळे खर्चाचे ताळमेळ बसवताना दोन वर्षांपासून कसरत करावी लागत आहे. तरीही पावसाळापूर्वी उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक यांच्या सूचनेनुसार कामांना गती देण्यात येत आहे.

- लक्ष्मीकांत कहार, मुख्याधिकारी. पेठ

फोटो - २९ पेठ नगरपरिषद-१

पेठ नगरपंचायतीमार्फत पावसाळापूर्वीची कामे सुरू आहेत.

===Photopath===

290521\29nsk_7_29052021_13.jpg

===Caption===

फोटो - २९ पेठ नगरपरिषद-१पेठ नगरपंचायत मार्फत पावसाळ्यापूर्वीच्या कामांना गती

Web Title: Pethla corona breaks recovery with funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.