पेठचा दुर्गम धानपाडा स्वच्छ आदिवासी पाडा; सरपंच रमेश यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:13 PM2019-02-28T18:13:40+5:302019-02-28T18:15:53+5:30
धानपाडा या लहानशा आदिवासी पाड्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरोडे यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यापुर्वी त्यांनी पाड्यावर कचरा टाकायचा कोठे? या प्रश्नाचे उत्तर शोधत ठिकठिकाणी क चरा कुंड्या बसविल्या.
नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत पेठ तालुक्यातील धानपाड्याचे सरपंच रमेश दरोडे यांनी आपले गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करत स्वच्छ आदिवासी पाडा बनविला. यासाठी त्यांना ‘स्वच्छता ’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.
धानपाडा या लहानशा आदिवासी पाड्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरोडे यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यापुर्वी त्यांनी पाड्यावर कचरा टाकायचा कोठे? या प्रश्नाचे उत्तर शोधत ठिकठिकाणी क चरा कुंड्या बसविल्या. सफाई कर्मचाऱ्यांकडून ओला-सुका कचरा वर्गीकरण करून घेतले. त्याद्वारे खतनिर्मिती करून खताचा उपयोग परसबागेसाठी केला. पाड्यावर ३२९ वैयक्तिक शौचालय उभारले. त्यामुळे गाव १०० टक्के हगणदारीमुक्त केले. तसेच या पाड्यावरील घरे येणा-या पाहुण्यांना एकसमान भासतात कारण येथे त्यांनी लोकसहभागातून विश्वासाने एकच रंग देण्याचा ठराव पारित करून अंमलबजावणी केली. महिलांकडून त्यांनी सामुहिक स्वच्छता सुरू केली. जिल्हा परिषदेच्या शाळेमार्फत स्वच्छता शिवार फेरी काढून जनजागृतीवर भर दिला. गावात संपुर्णत: प्लॅस्टिक बंदी केली. यामुळे त्यांना लोकमतच्या वतीने ‘स्वच्छता’ या गटात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.