पेठच्या संघाने पटकावला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:06 PM2020-12-26T17:06:03+5:302020-12-26T17:07:36+5:30

पेठ : येथील तालुका क्रिडा संकुल मैदानात आयोजित करण्यात पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पेठच्या संघाने प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे पारितोषिक पटकावले.

Peth's team won the first number | पेठच्या संघाने पटकावला प्रथम क्रमांक

पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा पारितोषिक वितरण प्रसंगी विलास अलबाड, मनोज घोंगे, शाम गावीत, कुमार मोंढे, गिरीश गावीत, विक्रम चौधरी, चंद्रशेखर पठाडे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देपेठ प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा : तालुक्यातून ४८ संघाचा सहभाग

पेठ : येथील तालुका क्रिडा संकुल मैदानात आयोजित करण्यात पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पेठच्या संघाने प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे पारितोषिक पटकावले.
यामध्ये तालुक्यातील ४८ संघानी सहभाग घेतला. पेठ व चिरापाली संघात झालेल्या अंतिम सामन्यात पेठने बाजी मारत प्रथम पारितोषिक मिळवले. नगराध्यक्ष मनोज घोंगे यांचेकडून सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. २१ हजाराचे प्रथम पारितोषिक, ११ हजाराचे द्वितीय पारितोषिक तर ७ हजार रूपयाचे तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा संयोजक प्रा. चंद्रशेखर पठाडे, विक्रम चौधरी, किरण गांगोडे, उतम गुंबाडे, शाम गावीत, विलास अलबाड, केतन कर्पे, महेश इंपाळ, नंदकुमार साबळे, कुमार मोंढे, गिरीष गावीत, मोहन कामडी, किरण भुसार, डॉ संतोष बोरसे, अमित जाधव, किरण बागूल, दिपक बेंडकोळी, हेमंत कडाळी, बलवंत कडाळी, करण शिंदे, हेमंत गोतरणे, दिगंबर डंबाळे, धनंजय सापटे, वैभव कस्तुरे, राज शिरसाठ, समिर शिरसाठ, उमेश जाधव गणेश शिरसाठ, बाळासाहेब भोये, करण करवंदे, याकूब शेख, योगेश राऊत, विनोद सहाळेगणेश शिरसाठ, बाळासाहेब भोये, करण करवंदे, याकूब शेख, योगेश राऊत, विनोद सहाळेगणेश शिरसाठ, बाळासाहेब भोये, करण करवंदे, याकूब शेख, योगेश राऊत, विनोद सहाळेगणेश शिरसाठ, बाळासाहेब भोये, करण करवंदे, याकूब शेख, योगेश राऊत, विनोद सहाळे यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकाल -
प्रथम - पेठ संघ, व्दितीय - चिरापली संघ, तृतीय - हरसूल संघ, उत्कृष्ट फलंदाज - हेमंत लहारे ( हरसूल). उत्कृष्ट गोलंदाज - रमेश मोळे ( चिरापली ), उदयोन्मुख खेळाडू - धर्मराज कनोजे ( चिरापली ), मॅन ऑफ दी मॅच - नामदेव गाडर ( पेठ ) आणि मॅन ऑफ द सिरीज - किरण गांगोडे ( पेठ ).

Web Title: Peth's team won the first number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.