सिव्हिलच्या वृक्षतोडीसाठी लवकरच याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:49 AM2017-09-13T00:49:38+5:302017-09-13T00:49:38+5:30
अर्भक मृत्यू : मनपाही करणार उपाययोजना नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक उपचार कक्षाच्या विस्तारिकरणात अडथळे ठरणाºया वृक्षतोडीसाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयात बाहेरून येणाºया रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करता यावेत, यासाठी महापालिकेनेही इन्क्युबेटर वाढविण्याची तयारी दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.
अर्भक मृत्यू : मनपाही करणार उपाययोजना
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भक उपचार कक्षाच्या विस्तारिकरणात अडथळे ठरणाºया वृक्षतोडीसाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयात बाहेरून येणाºया रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करता यावेत, यासाठी महापालिकेनेही इन्क्युबेटर वाढविण्याची तयारी दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.
जागेच्या अडचणीमुळे नवजात शिशुगृहाचे विस्तारिकरणात अडथळा निर्माण झाल्याची बाब अर्भकांच्या मृत्यूच्या वाढलेल्या संख्येवरून समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या जागेत असलेले वृक्ष तोडण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली होती. तथापि, महापालिकेच्या अखत्यारित ही बाब येत नसल्याचे महापालिकेने कळवूनही जिल्हा रुग्णालयाने त्याकडे दुर्लक्ष केले परिणामी विस्तारित कक्षाचे काम करता येऊ शकले नाही. वृक्षतोडीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीची गरज असल्याने यासंदर्भात पुढच्या आठवड्यात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील नवजात शिशू उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर दाखल केले जातात ते पाहता, महापालिकेने दहा इन्क्युबेटर बसविण्याची तयारी दर्शविली असून, त्यात आणखी वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले. नाशिकमध्ये बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होतात त्या प्रमाणात पुरेशी आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.