जायकवाडीतून पाणी सोडण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
By संजय पाठक | Published: November 13, 2023 04:28 PM2023-11-13T16:28:47+5:302023-11-13T16:29:54+5:30
जायकवाडी धरणातील तुट भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन धरणांमधून ८.३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दिले आहेत.
नाशिक- मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरण समुहातून पाणी सोडण्यास विरोध करणारी एक याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. भाजपच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अमृता पवार यांचीही याचिका दाखल केली असून त्यावर २१ नोव्हेंबरलाच सुनावणी हेाणार आहे.
जायकवाडी धरणातील तुट भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दोन धरणांमधून ८.३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दिले आहेत. त्याच्या विरोधात नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे तसेच खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठींब्याने अगोदरच दोन याचिका दाखल झाल्या आहेत त्यात शासनाने २२ डिसेंबर शासन आणि अन्य प्रतिवादींना म्हणणे मांडण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर आता जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या तसेच भाजपाच्या नेत्या अमृता पवार यांनी थेट सर्वेाच्च न्यायालयातच याचिका दाखल केली आहे. त्यावर २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मेंढेगिरी
समितीच्या शिफारसींचा आधार असलेली आकडेवारी सदोष असल्याचे अमृता पवार यांनी याचिकेत म्हंटले आहे.