त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:19 AM2018-05-21T01:19:58+5:302018-05-21T01:19:58+5:30

नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर देवस्थानावर नऊ सदस्य असून, त्यापैकी पाच परंपरेने कायम असतात़ परंपरेने असलेल्या सदस्यांच्या हितसंबधांमुळे उर्वरित विश्वस्तांकडून सदर भाविकांच्या हिताचे प्रस्ताव बहुमताअभावी मंजूर होत नाही़ त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची संख्या नऊ ऐवजी १३ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़

Petition regarding Trimbakeshwar Devasthan | त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत याचिका

त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत याचिका

Next
ठळक मुद्देललिता शिंदे : सदस्यसंख्या वाढविण्याची न्यायालयाकडे मागणीभाविकांनाही उच्च प्रतिच्या सुविधा का मिळू नये? असा प्रश्न

नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर देवस्थानावर नऊ सदस्य असून, त्यापैकी पाच परंपरेने कायम असतात़ परंपरेने असलेल्या सदस्यांच्या हितसंबधांमुळे उर्वरित विश्वस्तांकडून सदर भाविकांच्या हिताचे प्रस्ताव बहुमताअभावी मंजूर होत नाही़ त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची संख्या नऊ ऐवजी १३ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
देवस्थानावरील विश्वस्तांची संख्या वाढविण्याबरोबरच सर्व विश्वस्तांना ठराविक कालावधीसाठी अध्यक्षपदाची संधी मिळावी, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे़ शिंदे यांनी सांगितले की, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची एक हजार हेक्टर जमीन असून, यामधील विविध घोटाळे बाहेर येत आहेत़ त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी ट्रस्टचा अपेक्षेप्रमाणे विकास झालेला नाही़ याचे प्रमुख कारण म्हणजे विश्वस्त मंडळाची मर्यादित संख्या असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ या याचिकेची पुढील सुनावणी २ जुलै रोजी होणार आहे़ या विश्वस्त मंडळात महिलांसाठी आरक्षण असावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे़ त्र्यंबकेश्वर देवस्थान ही पब्लिक ट्रस्ट असल्याने देवस्थानचे अध्यक्षपद जनतेतून येणाºया प्रतिनिधींना मिळावे, सद्य: स्थितीत हे अध्यक्षपद कायमस्वरूपी असल्याने या ठिकाणी एकाधिकार शाही होत आहे़ यामुळे इतर विश्वस्तांच्या मताला कोणतीही किंमत राहत नसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे़जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या त्र्यंबकच्या विश्वस्तांची जबाबदारी वाढली आहे़ गत अनुभवावरून भाविकांच्या हिताचे विविध विषय समोर आले, त्यानुसार निर्णय घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला असता तो बहुमताने हाणून पाडला जातो़ धर्मादाय आयुक्तांकडून निवडलेले चार सदस्य अल्पमतात असता़ भाविकांचा सोयी, सुविधा कशा उभारता येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ देशातील विविध देवस्थानांमध्ये मिळणाºया सुविधांचा विचार करता त्र्यंबकेश्वरला येणाºया भाविकांनाही उच्च प्रतिच्या सुविधा का मिळू नये? असा प्रश्न ललिता शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Petition regarding Trimbakeshwar Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.