नाशकात पेट्रोल ८७, तर डिझेल ७४ रुपये ; चार वर्षातील विक्रमी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 05:58 PM2018-09-04T17:58:14+5:302018-09-04T17:59:59+5:30
गेल्यावर्षी केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्रोलचे दर जवळपास १२ रुपयांनी वाढून ८७.०१, तर डिझेल तब्बल १५ रुपयांनी महागल्याने ७४.८७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या चार वर्षांत झालेली ही विक्रमी वाढ असून, या दरवाढीविरोधात नाशिककरांनी संताप व्यक्त करीत पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली आहे.
नाशिक : गेल्यावर्षी केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्रोलचे दर जवळपास १२ रुपयांनी वाढून ८७.०१, तर डिझेल तब्बल १५ रुपयांनी महागल्याने ७४.८७ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या चार वर्षांत झालेली ही विक्रमी वाढ असून, या दरवाढीविरोधात नाशिककरांनी संताप व्यक्त करीत पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली आहे.
नाशिक शहरासह राज्य व देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असताना महागाईही संथगतीने वाढत आहे. केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केली असून, तेव्हापासून नाशिकमध्ये पेट्रोलच्या दरात १२.२३ रु पये प्रतिलिटरने वाढ होऊन ते ८७.१ रुपये प्रतिलिटर एवढी विक्रमी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या किमतीत १५.९५ रुपयांनी वाढ झाली असून, ते ७४.८७ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. इंधनाच्या किमती अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने अन्य जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतूक व पुरवठ्याचा खर्चही वाढला असल्याने महागाईत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण असून, शहरवासीयांकडून पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान,पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने दरवाढीच्या प्रमाणात रिक्षा व टॅक्षीसारख्या प्रवासी वाहनांना टेरीफ वाढवून मिळण्याची मागणी विविध संघटनांकडून जोर धरू लागली आहे.
सोशल मिडियातून टिकेची झोड
चार वर्षांतील उच्चांकी दर तेल कंपन्या रोजच्या रोजच तेलाच्या किमतीत वाढ करत आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीनी गेल्या चार वर्षांतील उच्चांक गाठला असून, सोशल मीडियातूनही पेट्रोल व डिझेल दरवाढीला विरोध होऊ लागला आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढणाºया किमतीची आकडेवारी व्हॉट्सअॅप, फेसबुक व टष्ट्वीटरच्या माध्यमातून शेअर करून सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.