विवाहित प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

By admin | Published: October 28, 2016 01:55 AM2016-10-28T01:55:13+5:302016-10-28T02:05:05+5:30

विवाहित प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

Petrol poured on the wedding of a married lover | विवाहित प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

विवाहित प्रेयसीच्या अंगावर ओतले पेट्रोल

Next


नाशिक : वेळ - रात्री साडेनऊ वाजेची. ठिकाण - सिटी सेंटर मॉल, उंटवाडी. प्रेयसीने दुसऱ्या मुलाबरोबर विवाह केल्याचा राग आल्याने प्रियकराने तिला अडवून विचारणा करत मारहाण केली आणि पेट्रोल अंगावर ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेल्या बुधवारी (दि.२६) येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिता व संशयित पंकज साहेबराव आहिरे (रा. खुटवडनगर) यांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे पीडित महिला व संशयित एकमेकांना ओळखत असून आहिरे याने महिलेला सिटी सेंटर मॉलच्या समोरील रस्त्यावर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अडवून शिवीगाळ केली व मारहाण करत अंगावर पेट्रोल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आहिरेविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक करुन गुरुवारी (दि.२७) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि.३१) पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर महिला खरेदीसाठी या परिसरात आली असता संशयित आरोपीने तिला अडवून शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांना प्रारंभी दाम्पत्यामध्ये भांडण होत आहे, असे वाटले; मात्र महिलेने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. यावेळी संशयित आहिरे याने घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर महिलेने गंगापूर पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच गंगापूर पोलिसांनी आहिरे यास अटक केली.

भर रस्त्यात घडला प्रकार
सिटी सेंटर मॉल समोरील एका मिठाईच्या दुकानासमोर भर रस्त्यात आहिरे याने विवाहितेला अडवून शिवीगाळ केली आणि मारहाण करीत अंगावर पेट्रोल ओतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन हस्तक्षेप केला आणि महिलेला सुरक्षित ठिकाणी बसविले. यामुळे महिलेचा जीव वाचला अन्यथा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

निर्जन रस्त्यांवर गस्त वाढवावी
शहरातील रिंगरोड, कॅनॉलरोड आदि ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. निर्जन रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास विविध जोडपे उभे राहतात आणि आपापसामध्ये वाद-विवाद होऊन भांडण टोकाला जाते. यामुळे पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Petrol poured on the wedding of a married lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.