पेट्रोल १८, तर डिझेल ६९ पैसे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:42 AM2018-10-07T00:42:00+5:302018-10-07T00:43:11+5:30

नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात केली आहे. परंतु, रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टीममुळे शनिवारी (दि. ६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असून, रोज वाढणाऱ्या इंधनाच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा प्रयत्नही थिटा पडला आहे.

Petrol is priced at 18, while diesel costs 69 paise | पेट्रोल १८, तर डिझेल ६९ पैसे महागले

पेट्रोल १८, तर डिझेल ६९ पैसे महागले

Next
ठळक मुद्दे पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी


नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात केली आहे. परंतु, रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टीममुळे शनिवारी (दि. ६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असून, रोज वाढणाऱ्या इंधनाच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा प्रयत्नही थिटा पडला आहे.
केंद्र सरकारने गेल्यावर्षी १६ जून २०१७पासून डायनॅमिक फ्यूएल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टीमची सुरुवात केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाºया बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्रोलचे दर ९१.७९ रुपयांपर्यंत, तर डिझेलचे दर ७९.३१ रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून, डिझेलमध्ये दीड रुपयाची कपात केली आहे. परंतु, शनिवारी पेट्रोल १८ पैशांनी महागले असून, डिझेल ६९ पैशांनी महागल्याने सरकारचे कर कपात करून इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न थिटे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये इंधन दरवाढीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, केंद्र सरकारने रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टिममध्येच कायमस्वरूपी बदल करण्यासोबतच पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून होत आहे.

 

Web Title: Petrol is priced at 18, while diesel costs 69 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.