पेट्रोलपंपचालकानेच केला १६ लाख लुटीचा बहाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:22 AM2017-10-04T00:22:08+5:302017-10-04T00:22:16+5:30
पंचवटी : सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे बँक बंद असल्याने मंगळवारी (दि.३) दुपारी बँकेत तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड भरण्यासाठी जाताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून रोकड असलेली बॅग लंपास केल्याचा बनाव खुद्द पेट्रोल पंपचालकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखलगाव परिसरात उघडकीस आला आहे.
पंचवटी : सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे बँक बंद असल्याने मंगळवारी (दि.३) दुपारी बँकेत तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड भरण्यासाठी जाताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून रोकड असलेली बॅग लंपास केल्याचा बनाव खुद्द पेट्रोल पंपचालकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखलगाव परिसरात उघडकीस आला आहे. घटनेनंतर पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पेट्रोल पंपचालकाची कसून चौकशी केली असता रोकड लुटीचा प्रकार घडलाच नसल्याची कबुली देत स्वत:च सोळा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पत्नीकडे देऊन दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून बॅग पळवून नेल्याचा खोटा बनाव करून पोलिसांना माहिती कळविल्याचे सांगितले.
याबाबत माहिती अशी की, आडगाव शिवारातील लाखलगाव परिसरात पेट्रोल पंप असून, शनिवार ते सोमवार अशा सलग तीन दिवस बँक बंद असल्याने पेट्रोल पंपावर सोळा लाख पाच हजार रुपयांची रोकड जमा झाली होती.
मंगळवारी दुपारी पेट्रोल पंपमालकाने आपण बँकेत रोकड भरण्यासाठी जात असल्याचे पेट्रोल पंपावर काम करणाºया काही कर्मचाºयांना सांगितले. त्यानंतर लाखलगाव येथे गेल्यानंतर त्याने रोकड असलेली बॅग पत्नीकडे दिली व नंतर पेट्रोल पंपावर फोन करून बँकेची स्लिप विसरल्याचे सांगून एका विश्वासू कर्मचाºयाला बोलावून घेतले, त्यानंतर पुन्हा थोड्यावेळाने पेट्रोल पंपावर व आडगाव पोलीस ठाण्यात फोनवरून रोकड लुटीची माहिती कळविली.
भरदिवसा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणा काहीशी हादरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी पोलीस कर्मचाºयांसह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पेट्रोल पंपचालकाची चौकशी केली असता त्याने सुटीमुळे बँक बंद असल्याने बँकेत सोळा लाख पाच हजार रुपयांची रोकड जमा करण्यासाठी जात असल्याचे सांगून बँकेची स्लिप विसरल्याने रस्त्यावर थांबलो होतो, त्यातदरम्यान काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून बॅग पळविल्याचे सांगितले.पितळ उघडसुरुवातीला पोलिसांना प्रकार काहीसा खरा वाटला, मात्र सदर प्रकाराबाबत पोलिसांनी उलटसुलट चौकशी केल्यानंतर पेट्रोल पंपचालकाचे बिंग फुटले. त्याने स्वत:च रोकड लुटीचा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले. आडगाव पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळेच सत्य बाहेर आले व पेट्रोल पंपचालकानेच कसा बनाव केला याचे पितळ उघड झाले.