विंंचूरला पेट्रोलपंप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 10:36 PM2020-04-07T22:36:13+5:302020-04-07T22:36:29+5:30
शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने शेतकºयांबरोबरच जनतेलाही जगण्यासाठी तो आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची गरज लागते. तसेच पुढील खरीप हंगामाच्या मशागतीसाठी देखील ट्रँक्टरसारख्या वाहनांची आवश्यकता आहे, परंतु पेट्रोलपंप बंद असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विंचूर : लॉकडाउनमुळे येथील दोन्ही पेट्रोलपंप बंद असल्याने इंधन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमाल हा खराब होणारा असल्याने त्याची वेळेवर विक्री करावी लागते. तसेच शेतमाल हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने शेतकºयांबरोबरच जनतेलाही जगण्यासाठी तो आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची गरज लागते. तसेच पुढील खरीप हंगामाच्या मशागतीसाठी देखील ट्रँक्टरसारख्या वाहनांची आवश्यकता आहे, परंतु पेट्रोलपंप बंद असल्याने शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहे. पेट्रोलपंपाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश आहे, परंतु येथील पेट्रोलपंपधारकांनी आपले पेट्रोलपंप बंद ठेवल्याने शेतकºयांना शेतमाल ने-आण करण्यासाठी अडचणी येत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात विंंचूर उपबाजार आवार ही जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती आहे जी मोकळ्या कांद्याचे लिलाव करीत आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत जिल्ह्याबाहेरून शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत असल्याने बाजार समिती पूर्ण भरून बाहेर अडीच ते तीन किलोमीटरच्या रांगा लागत आहेत. त्यातच येथील दोन्ही पंप महामार्गावर असूनदेखील बंद असल्याने शेतकºयांना डिझेलअभावी पायपीट करीत भरवस फाटा किंवा नैताळे येथे जावे लागते. तेथून डिझेल आणावे लागते. येथील किल्लेवाला पंपावर कर्मचारी नसल्याने पंप बंद असल्याचे सांगितले जाते तर लोखंडवाला पंपावर कर्मचारी उपस्थित असतानादेखील डिझेल विक्री बंद केली आहे, असा संताप त्रस्त शेतकरी व्यक्त करीत आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये शेतमाल विक्री, वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली परंतु डिझेल मिळत नसल्याने शेतकºयांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अत्यावश्यक सेवा बंद ठेवल्या तर त्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगितले जात असताना येथील पेट्रोलपंप बंद असल्याने त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे.