पेट्रोल पुन्हा नऊ पैशांनी महागले ; डिझेलचे दर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:07 AM2018-09-22T01:07:01+5:302018-09-22T01:07:30+5:30
देशभरात इंधन दरवाढीच्या भडक्यात सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असताना पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढतच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. इंधनदरवाढीच्या मालिकेच मंगळवापासून डिझेलचे दर स्थिर असले तरी पेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून,
नाशिक : देशभरात इंधन दरवाढीच्या भडक्यात सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असताना पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढतच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. इंधनदरवाढीच्या मालिकेच मंगळवापासून डिझेलचे दर स्थिर असले तरी पेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, गुरुवारी पेट्रोल सहा पैसे प्रति लिटरने महागल्यानंतर शुक्रवारी आणखी नऊ पैशांनी पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीला मंगळवारी व बुधवारी ब्रेक लागला होता. परंतु गुरुवारी (दि.२०) पेट्रोलचे दर सहा पैशांनी वाढले आहे, तर डिझेलचे दर मात्र स्थिर राहिलेल्याने मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांसह डिझेलवर चालणाºया वाहनधारकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु पेट्रोल दरवाढीचे सत्र सुरूच आहे. शहरात पेट्रोल दर गुरुवारी ६ पैसे वाढल्याने पेट्रोल ९०.०३ रुपयांनी विकले जात होते, त्यात शुक्रवारी ९ पैसे वाढ झाली. त्यामुळे आता पेट्रोल ९०.१२ रुपयांनी विकले गेले, तर डिझेलचे दर गेल्या चार दिवसांपासून स्थिर असून, डिझेल ७७.६७ रुपयांनी विकले जात आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूएल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूएल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या रोज बदलणाºया किमतीचा ग्राहकांना सामना करवा लागत असून, वर्षभरात पेट्रोलचे दर जवळपास १७ रुपयांनी वाढले असून, डिझेलचे दर १९ ते २० रुपयांनी वाढले आहे.