रिक्षाचालकाकडून बसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:40 AM2018-11-16T01:40:04+5:302018-11-16T01:40:18+5:30
शालिमार चौकातील बसथांब्यावर बुधवारी (दि.१४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका शहर बसवर रिक्षाचालकाने दगडफेक करून बसच्या काचा फोडल्याची घटना घडली.
नाशिक : शालिमार चौकातील बसथांब्यावर बुधवारी (दि.१४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एका शहर बसवर रिक्षाचालकाने दगडफेक करून बसच्या काचा फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालक श्याम बिनकर याच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शालिमार चौकात पंचवटी आगाराची बस (एमएच १५, एके ८०५२) चालक योगेश लक्ष्मण जगताप (रा. शिवशक्ती चौक, सिडको) हे बस घेऊन आले. यावेळी बिनकर याने बळजबरीने त्यांना बस पुढे घेण्यासाठी दबाव वाढविला; मात्र बसमधून प्रवासी चढ-उतार करत असल्याने त्यांनी बस पुढे घेतली नाही. शालिमार थांब्यावर बस उभी असतानाच बिनकर याने रस्त्यावरील दगड उचलून थेट चालकाच्या दिशेने भिरकावले. यामुळे बसच्या पुढील काचा फुटल्या. सुदैवाने बसचालक जगताप हे थोडक्यात बचावले. याप्रकरणी पोलिसांनी जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.