उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर ओतले पेट्रोल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 02:05 PM2020-10-22T14:05:43+5:302020-10-22T14:16:37+5:30
येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले.
नाशिक : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात एका व्यक्तीने चर्चा करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोलसदृश्य ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित पंकज जानकीदास बैरागी (३२,रा.सातपुर कॉलनी) या युवकाने पी.एफच्या रकमेबाबत चर्चा करत असताना स्वत:जवळील प्लॅस्टिकच्या बाटलीत पेट्रोलसारखे ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यास थांबविले. दरम्यान, या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच धावपळ उडाली. येथील बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले.
यावेळी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलिसांनी संशयित पंकजविरुध्द गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे.यावेळी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलिसांनी संशयित पंकजविरुध्द गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे.