पाथरे शिवारात पेट्रोलचा टॅँकर उलटला; मोठा अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:01 PM2019-04-06T16:01:54+5:302019-04-06T16:02:12+5:30
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील पाथरे शिवारातील बिरोबा मंदिराजवळील पुलाचे कठडे तोडून रस्त्याच्या खाली पेट्रोलने भरलेला टँकर शुक्र वारी ...
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील पाथरे शिवारातील बिरोबा मंदिराजवळील पुलाचे कठडे तोडून रस्त्याच्या खाली पेट्रोलने भरलेला टँकर शुक्र वारी (दि.५) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मुंबई येथून ईसार कंपनीचे सुमारे बारा हजार लिटर पेट्रोल घेऊन औरंगाबाद येथे सदरचा टँकर जात होता. पाथरे जवळील पुलाच्या वळणावर दुसऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर पुलाचा कठडा तोडून रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल गळती झाली. यात गाडीतील पेट्रोल गळल्याने आर्थिक हानी झाली मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. शनिवारी सकाळी दोन क्रेनच्या सहाय्याने खड्यात पडलेला टँकर काढण्यात आला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली होती. तसेच कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये तसेच सावधगिरीची उपाययोजना म्हणून सिन्नर नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली होती. वावी पोलीस ठाण्याचे कर्मचारी वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी उपस्थित होते. पेट्रोल ने भरलेला टँकर जर पुलाच्या खालीच कोसळला असता तर मोठया प्रमाणावर हानी झाली असती.पंरतु असा कुठलाही प्रकार घडला नाही.