इंदिरानगरला विद्युत तारांमुळे पेटला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:48 AM2018-01-15T00:48:28+5:302018-01-15T00:56:19+5:30

इंदिरानगर : गवताच्या पेंढ्यांची वाहतूक करणाºया ट्रकला विद्युत तारांमुळे आग लागल्याची घटना रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील नागरे मळ्यात घडली़ सिडको विभागाच्या अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी पोहोचला व आग विझविली़ सुदैवाने यामध्ये कोणतही जीवितहानी झाली नाही़

Petrol truck due to electrical power in Indiranagar | इंदिरानगरला विद्युत तारांमुळे पेटला ट्रक

इंदिरानगरला विद्युत तारांमुळे पेटला ट्रक

Next
ठळक मुद्देदुर्घटना टळली : तत्काळ आग विझविण्यात यशपाण्याच्या टँकरने आग विझविण्याचा प्रयत्न

इंदिरानगर : गवताच्या पेंढ्यांची वाहतूक करणाºया ट्रकला विद्युत तारांमुळे आग लागल्याची घटना रविवारी (दि़१४) दुपारच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील नागरे मळ्यात घडली़ सिडको विभागाच्या अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी पोहोचला व आग विझविली़ सुदैवाने यामध्ये कोणतही जीवितहानी झाली नाही़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास चेतनानगर परिसरातील नागरे मळ्यात गवताच्या पेंढीने भरलेला ट्रक (एम.एच१५ डिके ९६५५)जात होता़ या ठिकाणी असलेल्या विद्युतवाहक तारेला गवताच्या पेंढ्या लागल्याने घर्षण झाले व वाळलेल्या गवताने तत्काळ पेट घेतला़ हा प्रकार लक्षात येताच तेथेच असलेल्या पाण्याच्या टँकरने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग भडकत चालल्याने सिडकोच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली़
सिडको अग्निशमन विभागाचा एक बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी काही वेळातच आग विझविली़ ट्रकमध्ये वाळलेले गवत असल्याने त्याने तत्काळ पेट घेतल्याचे नागरिकांनी सांगितले़ दरम्यान, आग लवकर विझविण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़

Web Title: Petrol truck due to electrical power in Indiranagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.