उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर ओतले पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 12:26 AM2020-10-23T00:26:29+5:302020-10-23T00:27:14+5:30

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात एका व्यक्तीने चर्चा करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोलसदृश्य ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Petrol was poured on the body of the Deputy Collector | उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर ओतले पेट्रोल

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर ओतले पेट्रोल

Next
ठळक मुद्देठोकल्या बेड्या : आत्महत्येचा प्रयत्न भोवला

नाशिक : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात एका व्यक्तीने चर्चा करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोलसदृश्य ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित पंकज जानकीदास बैरागी (३२, रा.सातपूर कॉलनी) या युवकाने पीएफच्या रकमेबाबत चर्चा करत असताना स्वत:जवळील प्लॅस्टिकच्या बाटलीत पेट्रोलसारखे ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यास थांबविले. दरम्यान, या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच धावपळ उडाली. येथील बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाºयांनी वेळीच धाव घेत पंकजच्या हातातून पेट्रोलची बाटली जप्त करत त्यास दालनातून बाहेर काढले आणि पोलीस वाहनात डांबून थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात हलविले.
यावेळी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी संशयित पंकजविरु द्ध गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे. यावेळी पोलीस नाईक श्रीकांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी संशयित पंकजविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Petrol was poured on the body of the Deputy Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.