फडणवीस, प्रभूंसह आठ मंत्री नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:23 AM2017-07-30T00:23:35+5:302017-07-30T00:23:35+5:30
जिल्ह्यातील विकासकामांच्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह आठ मंत्री रविवारी नाशकात येत असून, दौºयात हवाई व रस्ता असे दोन्ही मार्गांचे पर्याय ठेवण्यात आले आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह आठ मंत्री रविवारी नाशकात येत असून, पावसाच्या संततधारेमुळे मंत्र्यांच्या दौºयात हवाई व रस्ता असे दोन्ही मार्गांचे पर्याय ठेवण्यात आले आहेत. निफाड तालुक्यातील लासलगाव येथे कांदा शीतगृहाचे भूमिपूजन व नाशिक येथे त्र्यंबक मेळा स्थानकाचे भूमिपूजन अशा दोन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस, सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे रविवारी नाशिक येथे आगमन होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावपळ वाढली असून, केंद्रीयमंत्री हेलिकॉप्टरने दौरा करणार असले तरी, लासलगावहून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौºयात मात्र हेलिकॉप्टरचा उल्लेख नाही. मात्र दौºयात बदल झाल्यास पूर्वतयारी म्हणून शनिवारी पुण्याहून लष्कराच्या हेलिकॉप्टरने नाशिक, लासलगाव, शिर्डी अशा प्रवासाची रंगीत तालीम केली. रात्रीतून जोरदार पाऊस झाल्यास हवाई दौरा रद्द होऊन रस्ता मार्गाची तयारीही प्रशासनाने करून ठेवली आहे.