फाळके स्मारक पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 06:19 PM2019-03-21T18:19:58+5:302019-03-21T18:47:48+5:30

इंदिरानगर : फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यास पालिकेने तत्वत: मान्यता दिली असल्यामुळे नाशिकचे वैभव असलेल्या फाळके स्मारकाचा चेहरामोहरा बदलू ...

Phalke. makjanhospital,memorial,awaiting,re-election | फाळके स्मारक पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत

फाळके स्मारक पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देमुहूर्त लागेना : पालिकेच्या दुर्लक्षामुळे महसुलातही घट

इंदिरानगर : फाळके स्मारकात फिल्म सिटी उभारण्यास पालिकेने तत्वत: मान्यता दिली असल्यामुळे नाशिकचे वैभव असलेल्या फाळके स्मारकाचा चेहरामोहरा बदलू शकतो, अशी अपेक्षा नाशिककरांना आहे. मात्र येथील कामकाज प्रत्यक्षात कधी सुरू होते, याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
फाळके स्मारक परिसरात दयनीय अवस्था झाल्याने पर्यटकांनी स्मारकाकडे पाठ फिरवल्याने महापालिकेच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. पंधरा वर्षांपूर्वी पांडवलेण्याच्या पायथ्याशी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून दादासाहेब फाळके स्मारक उभारले. या ठिकाणी लॉन्स, खेळणी, एमपी थिएटर, कलादालन ,म्युझिक कारंजा व चित्रप्रदर्शन आदींची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे नाशिकच्या सौंदर्यात भरच पडली होती. मुंबई महामार्गावरून नाशिकला प्रवेश करताना फाळके स्मारक पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले होते.
शहराला महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असल्याने स्मारकात नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असे. महापालिकेला प्रवेश शुल्कातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. दहा वर्षांपूर्वी दररोज तीस ते चाळीस हजार रुपयांचा महसूल गोळा केला जातो होता; परंतु आता केवळ तीन ते चार हजार रु पये दररोज महसूल जमा होत आहे. यातून साधे स्मारकाचे वीज बिलसुद्धा भरले जात नसल्याचे समजते. देखभाल व कर्मचाऱ्यांचा पगार कसा सुटेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या सहा ते सात वर्षांपासून स्मारकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामध्ये खेळणी तुटलेल्या काही भागात लॉन्स सुकलेले, तसेच संगीत कारंजा बंदावस्थेत आहे. याठिकाणी असलेल्या खुर्च्या आहेत की नाही असा प्रश्न पर्यटकांना पडतो. कलादालनाचा दरवाजा निखळून पडला आहे. देखभालीअभावी आणि सुविधांअभावी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसुलावरही मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे.

Web Title: Phalke. makjanhospital,memorial,awaiting,re-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.