मुस्लीम बांधवांनी घडविले माणूसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 06:10 PM2019-08-11T18:10:35+5:302019-08-11T18:11:07+5:30

वनसगांव : निफाड तालुक्यातील चाटोरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचे होत्याचे नव्हते झाले. तसेच नदीला पूर आल्याने गाव पूर्ण पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीसह हाल होत असल्याने निफाड तालुका मुस्लिम कमिटीच्या वतीने नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देत माणूसकीचे दर्शन घडविले.

 The philosophy of humanity created by Muslim brothers | मुस्लीम बांधवांनी घडविले माणूसकीचे दर्शन

मुस्लीम बांधवांनी घडविले माणूसकीचे दर्शन

googlenewsNext

परिसरात पूर आल्यानंतर चाटोरी गाव विस्थापित झाले होते. पूर ओसरल्यानंतर त्यातील काही विस्थापित लोकांचा अन्न आणि पाण्यासाठी संघर्ष सुरू होता. अशा परिस्थितीत येथील निफाड मुस्लिम तालुका कमिटीचे पदाधिकारी इरफान सय्यद. शकील भाई, अब्दुल शेख, वसीम पठाण, शमूभाई, नौशादभाई आदिंनी पिण्याचे पाणी व चारशे ते साडेचारशे पूरग्रस्तांचे अन्नपदार्थ घेत चाटोरी गाव गाठले व पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. त्यामुळे विस्थापित लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Web Title:  The philosophy of humanity created by Muslim brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.