दर्शन वानखेडे यांचासलग बारा तास अध्यापनाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:44 AM2017-12-21T00:44:04+5:302017-12-21T00:44:26+5:30

१२ तास, १२ विषय, १२ इयत्ता, १२ अध्यापनतंत्र, १२ शिक्षणपद्धती आणि या विद्यार्थ्यांना सलग १२ तास अविरतपणे केलेले अध्यापन असा विक्रम येथील शिक्षक दर्शन वानखेडे यांनी केला आहे. बुधवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता पेठरोडवरील उन्नती उच्च माध्यमिक विद्यालयात या विक्रमास प्रारंभ झाला.

Philosophy of Wankhede for the last 12 hours | दर्शन वानखेडे यांचासलग बारा तास अध्यापनाचा विक्रम

दर्शन वानखेडे यांचासलग बारा तास अध्यापनाचा विक्रम

googlenewsNext

नाशिक : १२ तास, १२ विषय, १२ इयत्ता, १२ अध्यापनतंत्र, १२ शिक्षणपद्धती आणि या विद्यार्थ्यांना सलग १२ तास अविरतपणे केलेले अध्यापन असा विक्रम येथील शिक्षक दर्शन वानखेडे यांनी केला आहे. बुधवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता पेठरोडवरील उन्नती उच्च माध्यमिक विद्यालयात या विक्रमास प्रारंभ झाला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे अध्यापनाचे काम केले. या विक्रमाची जागतिक वंडर बुक आॅफ लंडन आणि जिनियस बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली. दर्शन वानखेडे हे ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक असून, शिक्षण क्षेत्रात काहीतरी वेगळे भरीव काम करावे, विद्यार्थी व शिक्षकांची क्षमता जगाला समजावी या उद्देशाने हा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता राठोड, विजयालक्ष्मी मणेरीकर, अशोक श्रावण, अ‍ॅड. प्रवीण अमृतकर, नंदलाल धांडे, मुख्याध्यापक कल्पना शिरोडे, अशोक सोंजे यांचे मार्गदर्शन लाभले. याआधी त्यांनी सलग ६४ तास श्लोक पठणाचा विश्वविक्रम केला होता.  वानखेडे यांनी शिक्षण अध्यापन पदविका पूर्ण केली असून, इतिहास विषयात पदवी संपादन केली आहे. तसेच ते सध्या बीएड करत आहेत. सहा वर्षांपूर्वी अध्यापन क्षेत्रात पदार्पण केलेल्या वानखेडे यांनी ‘एक मिसळ बारा पाव’ हे शिक्षक व विद्यार्थी यांच्या जीवनावर आधारित बालनाट्य लिहिले आहे.  त्यांनी शिक्षणक्षेत्रात वेगळे कार्य करण्याचे स्वप्न पाहिले असून, ते आयुष्यभर या स्वप्नाची परिपूर्ती करत राहणार आहे. हा विक्रम या प्रवासाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. 
...म्हणून उन्नती विद्यालय 
दर्शन वानखेडे हे शिक्षक असलेली ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल ही शाळा केवळ १ ली ते १० वी पर्यंतच असल्याने तेथे हा विक्रम करणे शक्य नव्हते. त्यामुळे १ली ते १२ वीचे वर्ग असणाºया उन्नती उच्च माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली. जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी शाळेला मिळत असल्याने उन्नती एज्युकेशन संस्थेच्या या शाळेतील सर्व वर्गांच्या विद्यार्थी, शिक्षकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Web Title: Philosophy of Wankhede for the last 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.